कडा - खडकतमध्ये अवैद्यरित्या चालणा-या
कत्तलखान्यावर यापूर्वी पोलिसांकडून अनेकदा गोमांस, वाहने व जनावरे जप्त करुन आरोपीेंवर प्रतिबंधत्माक कारवाई करण्यात
आली असतानाही, प्रशासनाला ठेंगा दाखवून राजरोसपणे
चालणा-या कत्तलखान्यावर अखेर पोलिसांनी बेधडक छापा मारुन जेसीबी चालवून शनिवारी
येथील पाच कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची धाडसी कारवाई केली आहे.
आष्टी तालुक्यातील खडकत या गावात मागील अनेक वर्षापासून प्रशासनाला न
जुमानता लपूनछपून गोवंशीय प्राण्यांची क्रुरपणे हत्या करण्यात येत होती. यापूर्वी
बीडच्या पथकासह स्थानिक पोलिसांकडून खडकत येथे छापे मारून गोमांस, वाहने व जनावरे जप्त करुन आरोपीवर प्रतिबंधत्माक
कारवाई करण्यात आली. मात्र तरीही प्रशासनाला न जुमानता याठिकाणी जनावरांचा हा गोरख
धंदा राजरोसपणे चालू होता. अवैद्यरित्या कत्तलखाना चालकांना प्रशासनाची कसलीच भीती
राहिली नव्हती. त्यामुळे अखेर पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या
मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांसह महसूल पथकाने शनिवारी सकाळी येथील बेकायदेशीर
कत्तलखान्यावर थेट जेसीबी चालवून एकाच दिवशी पाच कत्तलखान्याने उद्ध्वस्त केले
आहेत. आष्टीचे नायब तहसीलदार बाळदत्त मोरे, पोलिस
निरिक्षक संतोष खेतमाळस, सपोनि श्रीकांत हिंगे, पोउनि कृष्णा शिंदे, धनवडे, पोह
अशोक शिंदे, पोना. प्रविण क्षीरसागर, संतोष दराडे, अमंलदार शेख यांच्यासह सीआरपीचे जवान, महसूल अव्वल कारकून गालफाडे, ग्रामविकास
अधिकारी जगताप आदींनी प्रथमच खडकत येथील बेकायदेशीर कत्तलखाना जेसीबी यंत्राणे
उद्ध्वस्त करण्याची बेधडक कारवाई केली. या कारवाईचे नागरीकांसह गोपालक संघटनांनी
स्वागत केले आहे.
0 Comments