कडा - सातारा जिल्ह्यातील वडूज पोलिस ठाण्यांतर्गत
मोकातर्गत गंभीर गुन्ह्यात दोन वर्षापासून पोलिसांना चकवा देणारा धर्मेंद्र उर्फ
धल्या ननशा काळे (वय-30) या आरोपीला चिखली परिसरात पोलिसांनी अक्षरश: पाच किमी
पाठलाग करुन गजाआड केल्याची थरारक घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.
आष्टी पोलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दैणंदिन कामकाज
चालू झाले होते. पोनि संतोष खेतमाळस नुकतेच येऊन ठाण्यात येऊन बसले. अन् अचानक
खब-याकडून गोपनीय माहिती मिळाली. सातारा जिल्ह्यातील वडूज पोलिस ठाण्यांतर्गत
64/2022 भादवी 395,397, व संघटीत गुन्हेगारी (मोका) यासह इतर गंभीर गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार
आरोपी धर्मेंद्र उर्फ धल्या ननशा काळे हा आष्टी तालुक्यातील चिखली परिसरात आला
आहे. पोनि खेतमाळस यांनी क्षणाची ही विलंब न करता त्या दिशेने पथक रवाना केले.
त्यानंतर काही वेळेतच आरोपी, पोलिसांचा सामना झाला. पोलिस
पाहताच आरोपीने पळ काढला. मात्र पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी अक्षरश: पाच किमी
पाठलाग करुन अखेर चिखली परिसरात त्याच्या मुसक्या आवळून गजाआड केले. सपोनि विजय
नरवडे, पोउनि कृष्णा शिंदे, पोहेकाॅ
अशोक शिंदे, पोना प्रविण क्षीरसागर, पोशि
राजाराम सजगणे, बब्रुवान वाणी, भरत
गुजर, अशोक तांबे यांनी सदर मोहिम फत्ते केली. शुक्रवारी
सायंकाळी आरोपीस सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोनि खेतमाळस यांनी
सांगीतले.
0 Comments