पाथर्डी - कोणत्याही क्षणी सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊ शकतात शासकीय
कर्मचारी पोलीस प्रशासन त्या कामात गुंतवणार असल्याने यात्रेसाठी अतिरिक्त पोलीस
बंदोबस्त देता येणार नाही. देवस्थान समितीने यात्रा कालावधीत ग्रामस्थांच्या
सहभागातून अतिरिक्त वाढीव स्वयंसेवक यात्रा कामासाठी नियुक्त करावेत. यासाठी गरज
पडल्यास अशा स्वयंसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण देऊ, अशी माहिती प्रांत
अधिकारी प्रसाद मते यांनी दिली.
श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत अशी पंधरा दिवस चालते. राज्यसह शेजारील राज्यातील भाविक सुद्धा मोठ्या संख्येने येऊन विविध धार्मिक विधी करतात.तीन टप्प्यात चालणाऱ्या यात्रेचा रंगपंचमी हा मुख्य दिवस असतो. यात्रा कालावधीमध्ये यात्रेवर प्रशासनाचे नियंत्रण असते. विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखासह देवस्थान समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक मढी येथे कानिफनाथ गडावर संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी प्रसाद मते होते. यावेळी तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक संतोष मुरकुटे, यासह परिवहन आरोग्य, सार्वजनिक बांधकाम ,सार्वजनिक आरोग्य, वनविभाग ,वीज वितरण नगरपालिका अशा प्रमुख यंत्रणाचे प्रतिनिधी , मढी देवस्थान अध्यक्ष तथा, सरपंच संजय मरकड, बबन मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे ,सचिव विमलताई मरकड , भाऊसाहेब मरकड, विश्वस्त अर्जुन शिरसाट,सचिन गवारे, डॉ विलास मढीकर,वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे,डॉ. रमाकांत मडकर, ग्रामपंचायत सदस्य भानूविलास मरकड , पोपट घोरपडे ,चंद्रभान पाखरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना
देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड म्हणाले, देवस्थान समितीने भाविकांना दर्शनबारीमधे पिण्याच्या दुष्काळ
परिस्थितीमुळे पाण्याची समस्या मोठी आहे. वांबोरी चारीचे पाणी तलावात सोडा.तसेच जल
जीवन योजनेमधून कासार पिंपळगाव ते मढी पाईपलाईन योजना मंजूर असून तेथील विहिरीच्या
जागेबाबत प्रशासनाने तात्काळ परवानगी दिल्यास यात्रे अगोदर पाईपलाईन पूर्ण होऊन
यात्रेसाठी भाविकांना पाणी देता येईल .वीज वितरण करून यात्रा कालावधीत भार निर्माण
करू नये. मढी ते तिसगाव व मढी ते फुलोराबाग
रस्ता प्रचंड खराब झाला असून यात्रा
अगोदर त्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे .दोन वर्षापासून जनजागृती करून
पशुहत्या बंदी करण्यात आली असून यावर्षीही पशु हत्या बंदी कायम राहणार असल्याचे
सरपंच संजय मरकड यांनी सांगितले.
यात्रा कालावधीत प्रचंड गर्दीमुळे मोबाईल टॉवर ताण पडून भाविकांचे मोबाईल बंद होरून संपर्क तुटतो त्यामुळे संबंधित कंपनीला कळवून ठिकठिकाणी मोबाईल टॉवरच्या व्हॅन उपलब्ध कराव्यात. तसेच पंढरपूरच्या धरतीवर फिरते शौचालय प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ भानूविलास मरकड यांनी केली. भाविकांच्या संख्येनुसार जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे परिवहन मंडळाच्या वतीने सांगीतले.
दुष्काळामुळे मढी यात्रेवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.यात्रेसाठी प्रशासनाने टप्प्याटप्प्याने टॅंकर उपलब्ध करून द्यावेत.टँकरचे पाणी परिसरातील विहिरीत व टाक्यामध्ये सोडून भाविकांना पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
0 Comments